ॲड. दत्ता पाटील विधी महाविद्यालयातर्फे वॉक फॉर फ्रिडम रॅली

| रायगड | प्रतिनिधी |

ॲड. दत्ता पाटील विधी महाविद्यालय आणि व्हिजन रेस्क्यु अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने वॉक फॉर फ्रिडम रॅलीचे आयोजन शनिवारी (दि.14) करण्यात आले होते. वॉक फॉर फ्रीडम हा मानवी तस्करीविरुद्ध जगातील सर्वात मोठा जनजागृती वॉक-21 या ना-नफा संस्थेने आयोजित केला होता. रॅलीची सुरुवात हिराकोट तलावापासून ते विधी माहाविद्यालयापर्यंत करण्यात आली होती. या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी मानवी तस्करीनिषेधार्थ काळे कपडे परिधान करुन विविधप्रकारच्या घोषवाक्यांचे फलक प्रदर्शित केले.

रॅली विधी महाविद्यालयात आल्यानंतर शपथविधी कार्यक्रमाचे आयोजन स्व.लोकनेते दत्ता पाटील खुला रंगमंच येथे करण्यात आले होते. विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य ॲड.नीलम हजारे यांनी मानवी तस्करीविरोधी शपथेचे वाचन केले आणि उपस्थित सर्वांनी शपथ ग्रहण केली.जनता शिक्षणाचे मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील यांनी आपल्या मनोगतात मानवी तस्करीमध्ये केवळ देह व्यवसायासाठी मानवांची तस्करी नव्हे तर भिकारी,अवयव विक्री, गुलामी,इ.कारणांसाठी सुध्दा केली जाते याबाबत चिंता व्यक्त केली. त्याकरिता युवांनी सहभागी होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. नंदकुमार पाटील यांनी संस्थेच्या कार्याबद्दल माहिती दिली.शपथविधी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी मैथिली भगत आणि आभार प्रदर्शन मानव टेमकर यांनी केले.

या रॅलीनिमित्त अलिबाग शहरातील व्हिजन रेस्क्यु संस्थेचे पदाधिकारी,समन्वयक केतकी पाटील, ॲड.दत्ता पाटील विधी महाविद्यालयासोबतच ,जे.एस.एम.महाविद्यालय आणि,पी एन.पी.महाविद्यालयातील प्रा.कैलास राजपूत,प्रा.पल्लवी पाटील, आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील, जे.एस.एम.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील ,विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य ॲड.नीलम हजारे, जे.एस.एम.महाविद्यालय एन.एस.एस.विभाग कार्यक्रम अधिकारी प्रा.अश्विनी आठवले आणि डॉ.पंकज घरत सांस्कृतिक प्रमुख प्रा.श्वेता पाटीलआणि डी.एल.एल.ई विभाग प्रमुख प्रा.लोणकर विधी महाविद्यालयाचे आय.क्यु.ए.सी.समन्वयक,डॉ.संदिप घाडगे,प्रा.मनोज धुमाळ,प्रा.समिक्षा म्हात्रे,प्रा.पियुषा पाटील, विद्यार्थी,शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील, उपाध्यक्ष डॉ.साक्षी पाटील,विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य ॲड. नीलम हजारे तसेच पी.आर.ओ.डा.सिमंतिनी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विधी महाविद्यालयातील महिला विभाग कक्ष आणि सांस्कृतिक समिती अंतर्गत प्रा.निलम म्हात्रे आणि प्रा.चिन्मय राणे,विद्यार्थी अनिकेत मोरे, व्हिजन रेस्क्यु टीम लिडर केतकी मंदा नंदकुमार पाटील यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.

Exit mobile version