। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील आवास येथे गुरुवारी (दि. 22) रात्री खून झाला. या गुन्ह्यातील आरोपी देवेंद्र म्हात्रे आणि वैभव म्हात्रे हे दोघेही विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांचे खास असल्याची माहिती समोर येत आहे. सत्तेत असलेल्या आमदारांच्या समर्थकांकडून कायदा बिघडविण्याचा प्रयत्न होत असल्याचा प्रकार या घटनेवरून उघड झाला आहे.
विवेक राणे यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या चार चाकी गाडीमध्ये पावसाचे पाणी जात होते. त्यामुळे त्यांच्या घरासमोरील शेडमध्ये विवेक राणे गाडी पार्किंग करीत होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना शिवीगाळी केली. मागील भांडणाचा राग धरून वैभव म्हात्रे व अंकित राणे यांनी फिर्यादीच्या भावाला पकडून ठेवले. त्यानंतर देवेंद्रने त्यांच्या छातीमध्ये चाकू भोसकून त्यांना गंभीर जखमी केले. शुभम पाटीलने विश्वासला पकडून आरोपीत अंकित राणे याने ठारच मारतो असे बोलून त्याचे छातीतसुद्धा चाकू भोसकला. फिर्यादी यांना वैभव म्हात्रे यांनी पकडून आरोपीत सिया म्हात्रे यांनी फिर्यादी यांचे पाठीमागे कमरेवर सुरा मारला. त्यावेळी त्यांची आई तिला पकडण्या करता आली असता, आरोपी पूनम म्हात्रे यांनी फिर्यादी यांचे आईचे मानेवर सुरा मारून दुखापत केली.
याप्रकरणी देवेंद्र म्हात्रे, वैभव म्हात्रे यांच्यासह सहा जणांविरोधात गून्हा दाखल करण्यात आला आहे. खून व मारामारी करणारे आरोपी हे आमदार दळवी यांचे खास असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही वर्षांपासून ते आमदार दळवी यांच्या सोबत शिंदे गटाचे कार्यकर्ते म्हणून काम करीत आहेत. वेगवेगळ्या कार्यक्रमात आमदारांच्यासोबत ते दोघेही कायम पुढे असल्याचेही चर्चा जोरात आहे.