| मुंबई | प्रतिनिधी |
दहिसरमध्ये एका 14 वर्षांच्या मुलाने आपल्या 13 वर्षीय वर्गमैत्रीणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पीडितेचा शाळेतील मित्र असलेल्या आरोपीने तिला पुस्तके देण्याच्या बहाण्याने आपल्या घरी नेले. त्यावेळी मुलगा घरी एकटा होता. तेव्हा आरोपीने आपल्या वर्ग मैत्रीणीवर अत्याचार केला. पीडिता आणि आरोपी दोघेही एकाच शाळेचे विद्यार्थी आहेत आणि एकाच वर्गात शिकतात. घटनेनंतर, पीडिता जखमी झाली आणि तिच्या कुटुंबाने तिला वैद्यकीय उपचारांसाठी सरकारी रुग्णालयात नेले. सुरुवातीला, आरोपीच्या भीतीमुळे आणि धमक्यांमुळे मानसिक धक्का बसलेल्या मुलीने घटनेबद्दल विसंगत माहिती दिली होती. याप्रकरणी पोलिस अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करून अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. त्याला डोंगरी सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.