। मुंबई । प्रतिनिधी ।
आयपीएलच्या रंगतदार 63व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर एकतर्फी विजय मिळवत प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. हा ऐतिहासिक सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला आणि त्याच क्षणी आणखी एका ऐतिहासिक क्षणाची नोंद झाली आहे. ज्येष्ठ नेते आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीने स्टेडियम उजळून निघाले होते. या सामन्यादरम्यान मुंबई क्रिकेट असो.चे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी शरद पवार यांना या स्टँडचे विशेष तिकीट देत त्यांचा गौरव केला.