। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानतळ सीमाशुल्क अधिकार्यांनी एका भारतीय प्रवाशाविरुद्ध 7 अत्यंत मौल्यवान घड्याळांची तस्करी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. प्रवाशाकडून अधिकार्यांनी 7 रोलेक्स घड्याळे, एक हिरे जडीत सोन्याचे ब्रेसलेट आणि आयफोन 14 प्रो जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेले एक घड्याळ सोन्याचे असून ते हिरे जडीत आहे. त्याची किंमत 27 कोटी 9 लाख 26 हजार 51 रुपये आहे. त्याचबरोबर एकूण जप्त केलेल्या मालाची किंमत 28 कोटी 17 लाख 97 हजार 864 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. आरोपी भारतीय दुबईहून फ्लाइट क्रमांक एघ 516 ने दिल्ली विमानतळावर पोहोचला होता. एपीआयएस प्रोफाइलिंगच्या आधारे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.