मुरुडमध्ये पाणी तुंबले नाही

मुख्याधिकाधिकाऱ्यांच्या नियोजनाचे कौतुक

| आगरदांडा | प्रतिनिधी |

पावसाळ्यापूर्वी मुरुड-जंजिरा नगरपरिषद हद्दीतील सर्व नाले, गटारांची सफाई करण्याचे आदेश प्रशासक मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी वेळेत देऊन पाणी रस्त्यावर तुंबणार नाही या संदर्भात उत्तम नियोजन केल्यामुळे शहरातील रस्त्यांवर पावसाचे पाणी तुंबलेले दिसून आले नाही. यंदा स्वच्छता विभागाने गटारांची स्वच्छता आणि रस्त्याच्या कडेला वाढलेली गवत, नाल्यात वर्षभर साचलेल्या गाळ आणि माती काढून टाकण्याचं चांगल्या पद्धतीने केलं गेलं, त्याबरोबर महिन्या महिन्यातुन स्वतः मुख्याधिकारी व त्यांचे कार्यालयीन सहकारी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी हातात झाडू घेऊन रस्तावर उतरून रस्ताची सफाई केल्यामुळेच आज शहरातील गल्ली गल्लीत पावसाचं पाणी साचलेले बघायला मिळालं नाही. यामुळे सर्वच स्थरांतून मुख्याधिकारी पंकज भुसे यांचे कौतुक होत आहे.

Exit mobile version