पहिल्याच पावसात पनवेल तुंबले

। पनवेल । वार्ताहर ।

सोमवारी सकाळपासून पावसाने पनवेल परिसरात पडण्यास सुरूवात केली होती. या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी तुंबण्याचे प्रकार घडले. यामुळे दहा मिनिटाच्या पडलेल्या पावसामुळे पनवेल महानगर पालिकेची नाले सफाईची पोलखोल उघडकीस आली.

मोठ्याप्रमाणात कोसळलेल्या पावसामुळे काही ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता. अनेक ठिकाणी महानगरपालिकेकडून समाधानकारक अशी नाले सफाई झाली नसल्यामुळे शहरातील अनेक भागात पाणी साठण्याचे प्रकार घडले. परंतु, या पावसाचा आनंद आबालवृद्धांसह बच्चे कंपनीने पावसात भिजून घेतला. तर अनेकांची या पावसामुळे चांगलीच धावपळ झाली. परंतु, उन्हाच्या काहिलीमध्ये अचानक सुरू झालेल्या पावसामुळे पनवेलकरांनी त्याचे स्वागत आनंदाने केले.

Exit mobile version