| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पातून शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला बसवण्यात आलेल्या एअर व्हॉल्वमधुन पाणी गळती होत असल्याने अनेक लिटर पाणी वाया जात आहे.
श्रीवर्धन येथे पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांमधून पाण्याबरोबर येत असलेली हवा बाहेर काढण्यासाठी आणि जलवाहिनी निकामी होऊ नये याकरिता अनेक ठिकाणी एअर व्हॉल्व बसविण्यात आले आहेत. एअर व्हॉल्व द्वारे जलवाहिनीतील हवा बाहेर काढली जाते, त्यामुळे जलवाहिनी फुटण्याची शक्यता कमी असते आणि गरजेनुसार हवा आत घेऊन जलवाहिनीत हवेची पोकळी निर्माण होऊ देत नाही.
श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे प्रवेशद्वार पासून शहरात सरळ मार्गावर जलवाहिन्या असल्याने ठराविक अंतरावर एअर व्हॉल्व टाकले गेलेत.उच्च दाबाची जलवाहिनी ज्या क्षेत्रात आहे त्या ठिकाणी एअर व्हॉल्व निकामी झाल्याचे दिसून येते. या व्हॉल्वमधुन सतत पाणी गळती होत असुन यामुळे पाणी वाया जाताना दिसते.श्रीवर्धन नगरपरिषदे कडून पाणी वाचवा पाण्याचा दुरूपयोग करू नका असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. परंतु, नागरिक गळक्या एअर व्हॉल्व खाली बादल्या ठेवत पाणी वाचवत असल्याचे चित्र दिसत आहे.
श्रीवर्धनमध्ये पाणी गळती
