पाणीटंचाई आराखडा कागदावरच

पाणीटंचाई आराखड्यात फक्त 25 गावांचा समावेश

| तळा | वार्ताहर |

तालुक्यात पाणीटंचाई निर्माण होणार्‍या गावांची व वाड्यांची यादी प्रशासनाकडे आहे. दरवर्षी या गावांत उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवते. तरीही कायमस्वरुपी उपाययोजना दरवर्षी तोच आराखडा नव्याने सादर करत ‘ये रे माझ्या मागल्या’ सारखा प्रकार घडत आहे. तात्पुरत्या स्वरुपात योजना राबविल्या की पुन्हा तीच स्थिती असते.

तळा तालुक्यात पाणीपुरवठा उपाययोजनेसाठी अंदाजित खर्च 12 लाख 50 हजार जानेवरी ते मार्च साठी प्रस्तावित आहे. त्यात 25 गावे आणि 27 वाड्यांचा समावेश आहे. काही मार्च अखेरपासून पाणी समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. तालुक्यात पाण्याच्या योजनांवर करोडो रूपये शासनाकडून खर्च झाले असले तरी आजही तळा तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईची समस्या का निर्माण होत आहे, असा प्रश्‍न सामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.

तालुक्यात नवीन पाणीपुरवठा योजनेची कामे चालू आहेत, त्यामुळे तालुक्यातील पाणीसमस्या आगामी काळात मार्गी लागतील. तालुक्याचा उन्हाळी संभाव्य पाणीटंचाई आराखडा 2022-23 तयार करण्यात आला आहे. या पाणीटंचाई आराखड्यात समाविष्ट करण्यात आलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने योग्य ती उपाययोजना करण्यात आली असून, त्यासाठी अंदाजित खर्च 12 लाख 50 हजार एवढा होणार असल्याचा अंदाज आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत विंधण विहीर दुरुस्ती करण्यासाठी 6 गावे व नवीन विंधण विहीर खोदणे प्रस्तावित गावे 25 व प्रस्तावित 27 वाड्या असे एकूण 15 विंधण विहिरी विशेष दुरुस्ती करणे अंदाजपत्रकीय खर्च साडे सात लाख रुपये येणार आहे. तर एकूण 52 नवीन विंधण विहीर खोदणे अंदाजपत्रकीय खर्च 39 लाख रुपये होणार असल्याचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. पाणीपातळी कमी होत असल्याने या काळात पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्या दृष्टीने पाणीटंचाई आराखड्यात संभाव्य उपाययोजनांचा तळा तालुक्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. काही कालावधीत तालुक्याचा पाणीप्रश्‍न निकाली निघेल, असे म्हटले जात आहे.

धरण होणे गरजेचे
तळा तालुक्यात जलसंजीवनी म्हणून 1989 ला बांधण्यात आलेल्या वावे हवेली येथील धरणाकडे जात आहे. हे धरण अनेक गावांची तहान भागवत आहे. तसेच बारपे येथे धरणाचे अर्धे काम झाले आहे. या धरणाचे काम पूर्ण झाल्यास शेती तर ओलिताखाली येईलच; परंतु पाणी समस्याही कायमची निघून जाईल. हे धरण पढवण, महागाव विभागासाठी वरदान ठरणारे आहे. कुंभळे या भागात मालूककडून येणार्‍या नदी वजा ओढ्यावर अनेक ठिकाणी डोह आहेत. या भागात योग्य नियोजन करून धरण बांधण्यास योग्य क्षेत्र आहे. या भागात शासनाने धरण बांधल्यास येथील शेतकरी समृद्ध होऊन येथील नागरिकांचा पाणी प्रश्‍नदेखील मार्गी लागेल.

Exit mobile version