| पाली/गोमाशी | वार्ताहर |
सुधागड तालुक्यात घोटवडे-गेटवाडी या ठिकाणी गाव विकास समिती गेटवाडी यांना स्वदेस फाऊंडेशनतर्फे दि. 21 रोजी पाणी पुरवठा योजना हस्तांतरण करण्यात आली.
कित्येक वर्षांपासून गेटवाडी गावातील महिला हातपंप, बोअरवेलच्या साह्याने गावापासून 200 मीटर अंतरावर डोक्यावर पाण्याच्या हंडे वाहात होत्या. मात्र, गावात स्वदेस गाव विकास समितीच्या माध्यमातून पाणी ही मुख्य समस्या डोळ्यासमोर ठेवून स्वदेश फाऊंडेशन यांच्या सहकार्यातून प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा केला आहे. स्वदेस फाऊंडेशन यांनी या गावात पाणी योजना राबविण्याचे ठरविण्यात आले. त्या अनुषंगाने ती पाणी योजना पूर्णत्वास नेहून गेटवाडी ग्रामस्थांना हस्तांतरण करण्यात आली.
या योजनेमुळे पाण्याची समस्या आज संपुष्टात येऊन सौरऊर्जेवर ही योजना असल्यामुळे कायमस्वरूपी लाईट बिल मुक्त पाणी योजना, मासिक खर्च कमी होऊन आर्थिक बचत होईल. पाणी फिल्टर करून येत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल. सर्व ग्रामस्थ व गाव विकास समिती सदस्याने स्वदेस फाउंडेशनचे आभार व्यक्त केले.
यावेळी स्वदेस फाऊंडेशन तालुका व्यवस्थापन विकास खरमाळे, पाणी योजना व्यवस्थापक प्रवीण पाटील, इंजिनिअर राकेश बारस्कर, महेश गोरेगावकर आणि परळी विभाग समन्वयक श्रीधर कोकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पाणी योजना हस्तांतरण करण्यात आली.
