| श्रीवर्धन | वार्ताहर |
स्वदेस फाऊंडेशनतर्फे माणगाव तालुक्यातील भुवन आदिवासी वाडी येथे ग्रामस्थ, शाळेतील शिक्षक व स्वदेस प्रतिनिधी ललिता दांडेकर यांच्या उपस्थितीत नुकतीच पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली.
गेली काही वर्षे भुवन आदिवासी वाडी ग्रामस्थ पाण्याच्या प्रतीक्षेत होते. येथील महिलांना डोक्यावर दोन किलोमीटर अंतरावरुन पाणी आणावे लागत होते. स्वदेस फाऊंडेशनमुळे आज नळाने प्रत्येकाच्या दारात पाणी पोहोचल्यामुळे ग्रामस्थांच्या चेहर्यावर कमालीचा आनंद पसरला आहे. स्वदेस फाऊंडेशन प्रतिनिधी ललिता दांडेकर व जगदिश्वर नाते यांनी याकामी पुढाकार घेऊन हा पाण्याचा प्रश्न सोडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.