व्यासपीठावर येताना मान्यवरांचे ढोल ताशांच्या गजरात,तुतारीच्या निनादात,कार्यकर्त्यांच्या संचलनात आगमन झाले आहे. व्यासपीठावर येताना करण्यात आलेल्या पुष्पवृष्टीने सारे अतिथी भारावून गेले आहेत.व्यासपीठावर आगमन होताच लालबावट्याचे प्रमुख अतिथी संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी करतो आम्ही सलाम याला, करतो आम्ही सलाम हे गीत सादर करण्यात आले. त्यानंतर सर्वांना प्रतीज्ञाही देण्यात आली. या प्रतिज्ञेनंतर सरचिटणीस आ.जयंत पाटील यांनी लाल बावटे की जय, शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो अशा घोषणा देत कार्यकर्त्यांमध्ये एकच जोष निर्माण केला.मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांसह अन्य मान्यवरांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
सविस्तर वृत्त लवकरच