| सुधागड-पाली | वार्ताहर |
पाली हे शहर अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र आहे. यामुळे येथे बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटक व भाविकांकडून पाली नगरपंचायतीतर्फे यात्रा कर घेतला जातो. वाहने थांबविण्यासाठी येथील स्टेट बँक व पंचायत समितीजवळील रस्त्यांवर बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. मात्र, बऱ्याचवेळा हे बॅरिकेट्स काढले जात नाहीत आणि यामुळे वाहनचालकांना बॅरिकेट्सचा अडथळा निर्माण होत आहे. स्थानिक व भाविक यामुळे वैतागले आहेत.
यात्रा कर वसुलीसाठी येथील रस्त्याच्या मधोमध रस्त्यांवर बॅरिकेट्स टाकून वाहने थांबवली जाते आहेत. पाली नगरपंचायत वसुली पथकाकडून संध्याकाळच्या वेळेस एसबीआयजवळील बॅरिकेट्स काढले जाते. मात्र, पंचायत समितीजवळील बॅरिकेट्स काढले जात नसल्याने स्थानिक वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. भरधाव येणारे वाहन चालक बॅरिकेट्सला धडकून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हे बॅरिकेट्स बाजूला काढणे आवश्यक आहे.