किरण कांबरीचे जल्लोषात स्वागत

। नेरळ । वार्ताहर ।

सैन्य दलात भरती होऊन देशसेवा करण्याची स्वप्ने अनेकांची पूर्ण होतातच असे नाही. सैनिक सीमेवर जीवाची बाजी लावून देशाचं संरक्षण करीत असतो. पण हा सैनिक जेव्हा देशसेवा करुन पुन्हा एकदा घरी परततो तेव्हा प्रत्येकाचं ऊर अभिमानाने भरुन येत असतो. असाच अनमोल क्षण कर्जत तालुक्यात पाहायला मिळाला. 19 वर्ष देशाचे रक्षण करून सुखरूप घरी परतणार्‍या कांबरी कुटूंबातील एका जवानाचे त्याच्या राहत्या घरी गावकर्‍यांनी जंगी स्वागत केलं.

कर्जत तालुक्यातील पोशीर गावातील तरूण किरण भाऊ कांबरी हा 2005 साली भारतील स्थलसेना सैन्यदलात भरती झाला होता. त्यांने तब्बल 19 वर्ष देशसेवा केली आणि आपल्या आयुष्यातील उमेदीला काळ देशसेवेसाठी अर्पण केला तब्बल 19 वर्षानंतर हा तरूण सैन्यलातून हवालदार या पदावरून सेवानिवृत्त झाला. त्याचा सेवा निवृत्तीचा कार्यक्रम पोशीर या मुळगावी आयोजित करण्यात आला होता. यावेळी आ. ज्ञानेश्‍वर म्हात्रे, मनोहर थोरवे, राहुल विशे, सावळाराम जाधव, विजय हजारे, हनुमंत भगत, ग्रामस्थ, नातेवाईक व मित्रपरिवार मोठया संख्येने उपस्थित होता.

Exit mobile version