नगराध्यक्षा जोशी यांचे जिल्हाधिकार्यांना आवाहन
कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची भेट घेऊन नगरपरिषदेचे विविध विकासकामांचे प्रस्ताव सादर केले.विकासकामांमध्ये सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची बदली झाली, त्याच्या जागी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी रायगड चे जिल्हाधिकारी म्हणून सूत्रे हाती घेतली, अश्या नवनिर्वाचित जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी भेट घेतली त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्या समवेत केतन जोशी, कर्जत नगरपरिषदे चे स्वच्छता निरीक्षक सुदाम म्हसे उपस्थित होते. नगरपरिषद हद्दीतील काही कामे मार्गी लावण्याच्या दृष्टीने नगरपरिषदेचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केले, नगरपरिषदेची कामांबाबत सविस्तर चर्चा केली तसेच कर्जत नगरपरिषद क्षेत्रात 100 टक्के लसीकरण व्हावे या दृष्टीने नगरपरिषदेचे प्रयत्न सुरू आहेत, प्रत्येक प्रभागात नगरसेवकांच्या आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने लसीकरण शिबीर सुरू आहेत, मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध व्हावी अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्याकडे केली. जिल्हाधिकारी यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आणि कर्जतसाठी जास्तीत जास्त लस उपलब्ध करून देणार आहेत असे नगराध्यक्षा जोशी यांनी सांगितले.