पडलेल्या भाताचे करायचे काय?

शेतकर्‍यापुढे प्रश्‍नचिन्ह
पाताळगंगा | वार्ताहर |
गुलाबी चक्रीवादळामुळे शेकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. भातशेती पडून पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे केलेल्या मेहनतीवर पाणी फिरले असून, शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. कापणीस तयार झालेले भातपीक पावसामुळे वाया जाण्याची भीती असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.
भातशेती पूर्णपणे तयार झाल्यामुळे सर्व ठिकाणी सोनेरी शाल परिधान केलेचा भास तयार होत आहे. तर, दुसरीकडे पावसामुळे पडलेल्या भातशेती दुबारा अंकुर फुटल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. गेले चार पाच महिने मेहनत घेऊन हातामध्ये हवे तेवढे धान्य मिळत नसल्यामुळे शेतकर्‍यांनी शेतीकडे पाठ फिरवली आहे. आजही तालुक्यातील असलेल्या भातशेती ओसाड माळरान म्हणून दिसत आहे. अनियमित पडणारा पाऊस, ओळा दुष्काळ, मजुरांचा खर्च त्याचबरोबर शेतीच्या कामाला मजूर मिळत नसल्यामुळे तसेच वाजवीपेक्षा जमीन लागवडीसह खर्च अधिक आणि त्यामानाने उत्पन्न कमी येत असल्याने बळीराजा शेतीकडे पाठ फितवित आहे.
शेती आपला अर्थशास्त्राचा कणा असे संबोधले जात असले तरीसुद्धा शेतीलागवड हवे तेवढ्या प्रमाणात होतच नाही. पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले असून, यामुळे वर्षभर पुरेल इतके धान्य मिळेल की नाही याची शास्वती नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Exit mobile version