| सुतारवाडी | प्रतिनिधी |
भिरा फाटा ते ढोकळेवाडी या नऊ किलोमीटर अंतरावरील मुख्य रस्त्यावरील साईटपट्टी व रस्त्याच्या मधोमध पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या मारल्या होत्या. मात्र दोन वर्षातच या पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या गायब झाल्या आहेत. त्यामुळे एखादा अपघात झाला तर जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. भिरा फाट्यापासून विळा भागाड यादरम्यान पूर्वी अनेक अपघात झालेले आहेत. या अपघातात काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. ढोकळेवाडी ते मस्करवाडी दरम्यान सात खडी क्रेशर व एक डांबर प्लांट आहे. तेथून खडीची वाहतूक डंपरने मोठ्या प्रमाणावर सातत्याने होत असते. त्याचप्रमाणे वाळजवाडी डोंगरावरून मातीने भरलेले डंपर सुद्धा मोठ्या प्रमाणावर धावत असतात. येथून पुण्याकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्यामुळे तेथून जाणार येणाऱ्या लहान मोठ्या वाहनांची माती व खडी घेऊन जाणाऱ्या डंपरची पर्यटनासाठी येणाऱ्या जाणाऱ्या लक्झरी बसेसची लहान मोठ्या वाहनांची तसेच कॉईल घेऊन जाणा-येणाऱ्या ट्रेलर यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी रस्त्याच्या मधोमध त्याचप्रमाणे पांढऱ्या रंगाची साईडपट्टी असणे अत्यंत गरजेचे आहे. संबंधित खात्याने याबाबत दक्षता घ्यावी, अशी जनतेची मागणी आहे.
मुख्य रस्त्यावरील पांढरे पट्टे गायब
