। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेकापचे नेते जयंत पाटील यांचे स्नेही, अलिबाग अर्बन बँकेचे माजी संचालक तसेच हॉटेल व्यावसायिक आनंद विठोबा मोकल यांचा 80 वा वाढदिवस अलिबागमध्ये शुक्रवारी सायंकाळी उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
यावेळी बांधकाम व्यावसायिक मुकुंद म्हात्रे आदी राजकीय, सामाजिक, व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी व त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होेते.
आनंद मोकल हे आनंद विहार हॉटेलचे मालक असून, त्यांनी राजकीय, सहकार, सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना हॉटेल व्यावसायिक म्हणूनदेखील स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. अलिबाग तालुक्यातील चेंढरे येथील भाग्य लक्ष्मी सभागृहात त्यांचा 80 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी घरातील महिलावर्गांकडून 80 दिव्यांची ओवाळणी करून त्यांचे औक्षण करण्यात आले.