| रसायनी | प्रतिनिधी |
रसायनी तील सावळे येथे महिलेला कोयत्याने मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली. याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 11 वाजल्यापासून दि. 4 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 11 वाजेपर्यंतच्या कालावधीत आरोपीने महिला फिर्यादीच्या घरी जाऊन, ‘तुला मला ठेवायचे नाही’ असे रागाच्या भरात बोलून शिवीगाळ केली. त्यानंतर आणलेल्या कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात वार करून तिला दुखापत केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान, भांडण सोडविण्यासाठी फिर्यादीची आई पुढे गेली असता झटापटीमध्ये कोयत्याचे टोक त्यांच्या खांद्याला व डाव्या हाताला लागून दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर आरोपीने फिर्यादीचा हात जबरदस्तीने पकडून तिला देवळोली येथील क्रिकेट मैदानावर नेले. तेथे पुन्हा हाताबुक्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.
सावळेत महिलेला कोयत्याने मारहाण
