डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू

। पनवेल । वार्ताहर ।
डंपरने दिलेल्या धडकेत 41 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शिवनसई येथे येथे घडली आहे. गुलाब (लता) गणेश तांबोळी असे मृत महिलेचे नाव आहे. डंपर क्रमांक एमएच 05 डीके 2727 वरील चालक दगडू चंदर हिलम हा दुंदरे गावातून पनवेल बाजूस येत होता. यावेळी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगईने त्याने वाहन चालवले. आणि गुलाब गणेश तांबोळी यांना ठोकर मारली. यात त्यांचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. याप्रकरणी चालकाविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version