| उरण | प्रतिनिधी |
सारडे गावातील महिला महादुबाई महादेव माळी (77) यांना सर्पदंश झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. 4) घडली. महादूबाई माळी असे या महिलेचे नाव आहे. त्या बुधवारी रात्री आठच्या सुमारास घरामध्ये एकट्याच होत्या. त्यावेळी सर्वत्र लाईटही गेल्याने त्यांनी घराबाहेर पडताना बॅटरी घेतली नव्हती. पायला काहीतरी चावले असे जाणवले. काही वेळाने तिला अस्वस्थ वाटू लागले. तिच्या मुलांनी तिला तात्काळ उपचारासाठी उरणच्या रुग्णालयात नेले. मात्र, उपचार वेळेवर न मिळाल्याने तिचा रस्त्यातच मृत्यू झाला.