। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव उपजिल्हा रुग्णालयात रोहा तालुक्यातिल पुई गावच्या एका 23 वर्षाच्या महिलेने मंगळवारी (दि.17) तीन बालकांना जन्म दिला आहे. येथील डॉ. रामदास तरपेवाड यांच्यासह परीचारीका अनिता करकरे, वनिता तेटगुरे व वैशाली घोगरे यांनी या महिलेची नैसर्गिक प्रसुती यशस्विरित्या केली असून माता व बालके सुखरुप आहेत.
रोहा. तालुक्यातिल पुई (कोलाड) गावची महिला मनिषा अजय कातकर हिला प्रसूतीसाठी माणगाव उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले होते. याठिकाणी या महिलेला दाखल केल्यावर येथिल डॉ. रामदास व त्यांच्या टिमने महिलेला तपासुन काही अवधित महिलेची नैसर्गिक प्रसूती केली. यावेळी या महिलेने तीन बाळांना जन्म दिला. प्रसुतिनंतर माता व तीनही बालकांची प्रकृती ठिक असुन या कामगिरिने माणगाव उपजिल्हा रूग्णालयाचे विशेष कौतुक होत आहे.