| पनवेल । वार्ताहर ।
तालुक्यातील डेरवली गावातून एक महिला राहत्या घरातून कोणास काही न सांगता निघून गेल्याने ती हरविल्याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यानुसार पोलीस बेपत्ता महिलेचा शोध घेत आहेत.
शोभा चंद्रकांत चव्हाण (वय 50) असे बेपत्ता महिलेचे नाव असून उंची अंदाजे पाच फूट, रंग गोरा, बांधा मजबूत, केस काळे व लांब, अंगात साडी नेसलेली आहे. सोबत कपड्यांची बॅग आहे. ही महिला डेरवली येथील राहत्या घरातून न सांगता निघून गेली असल्याने संतोष चंद्रकांत चव्हाण यांनी ती हरविल्याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यात केली. या महिलेबाबत कोणास माहिती असल्यास त्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस नाईक डी. एस. चव्हाण यांनी केले आहे.