। रायगड । खास प्रतिनिधी ।
स्टार प्रवाहवरील कलाकार आकाश नलावडे, शिवानी बावकर, पुजा बिरारी, ज्ञानदा रामतीर्थकर यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी महिलांनी व्यासपिठावर तोबा गर्दी केली होती. आपल्यावर भरभरुन प्रेम करणार्यांसाठी संबंधितांनी नाक न मुरडता त्यांच्यासोबत सेल्फी घेतली. त्यामुळे प्रत्येक महिलेच्या चेहर्यावर आनंद आणि समाधानाचा भाव दिसून आला. आमच्यावर असेच प्रेम करत राहा आणि स्ट्रार प्रवाह वाहिनीवरील सर्व मालिका न चुकता बघत राहा, अशी प्रेमाची विनवणी सेलिब्रेटींनी केली.
कृषीवलचा हळदीकुंकू समारंभ आज महाराष्ट्रात एक ब्रॅण्ड बनला आहे. एवढ्या मोठ्या संख्येने महिला वाण लुटण्यासाठी येतात याची खरच कल्पना केली नव्हती. सुप्रिया पाटील आणि चित्रलेखा पाटील यांनी सुरु केलेला उपक्रम खरच चांगला आहे. त्या निमित्ताने महिला आपल्यासाठी स्वतंत्र वेळ काढून आनंदाचे क्षण जगतात. प्रत्येक महिलांच्या भाग्यात असा क्षण येण्यासाठी हा उपक्रम असाच अविरतपणे सुरु राहिला पाहीजे. वेळोवेळी अशा कार्यक्रमांना मी येतच राहीन.
– आकाश नलावडे
(साधी माणस मालिकेतील सत्या)
महिला एवढ्या मोठ्या संख्येने वेळात वेळ काढून वाण लुटण्यासाठी येतात, हे खूपच अभिमानास्पद आहे. तुमच्यासोबत आम्हालाही हे सुखाचे क्षण अनुभवता आले. त्याबद्दलही चित्रलेखा पाटील आणि स्ट्रार प्रवाह वाहिनीचे आभार मानते. हळदीकुंकू आधी घरात व्हायचा अलिबागमधील हा समारंभ पाहून त्याला किती भव्यदिव्य स्वरुप आले आहे, हा अनुभव फारच रोमांचकारी होता.
– पुजा बिरारी
(येड लागलं प्रेमाचं मालिकेतील मंजिरी)
कृषीवलच्या हळदीकुंकू समारंभाला तब्बल 30 वर्षांची परंपरा आहे. हे ऐकून मी थक्कच झाले. सलग 30 वर्ष कार्यक्रम घेण्यासाठी प्रचंड मेहनत, जिद्द लागते आणि ती पूर्ण करण्याचे काम चित्रलेखा पाटील आणि सुप्रिया पाटील यांनी केले आहे. प्रचंड गर्दी पहिल्यांदाच पाहत आहे. महिला स्वतःसाठी वेळ काढतात हे पाहून फारच आनंद वाटला. महिलांना मानसन्मान दिला जातो ही खरच समाधानाची बाब आहे. मी अलिबागकर असल्याचा मला अभिमान आहे.
– शिवानी बावकर
(साधी माणस मालिकेतील मीरा )
नेहमीच चूल आणि मुल संभाळणार्या महिला आज उंबरठा ओलांडून बाहेर पडल्या आहेत. त्या महिला रात्रंदिवस आपल्या कुटूंबासाठी सातत्याने राबत असतात. त्या महिला स्वतःसाठी वेळ काढून हे क्षण जग आहेत. हे पाहून आनंद झाला. कृषीवलने सर्व महिलांना एक व्यासपीठ मिळवून दिले आहे. त्यामुळेच हे शक्य झाले आहे. ही परंपरा कृषीवलने कायम सुरु ठेवावी आणि महिल्यांच्या जीवनात आनंद द्यावा.
– ज्ञानदा रामतीर्थकर
(लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतील काव्या)