। खोपोली । प्रतिनिधी ।
रात्रीचा प्रावस करताना अंधार अडचणी निर्माण होत असल्याने पालिकेच्या माध्यमातून या भागात रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट खांब बसविण्याचे काम सुरू झाल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. खोपोली नगरपालिका हाद्दीतील सुभाष नगरात मोठ्याप्रमाणात 50 वर्षांपासून लोकवस्ती आहे. कारखान्याच्या मागेच लोकवस्ती असल्याने पालिकेला नागरी सुविधा देताना अडचणी भासत होत्या. सामजिक कार्यकर्ते राहुल जाधव व येथील गावकर्यांनी खोपोली नगरपालिकेकडे आणि स्थानिक नगरसेवकांकडे नागरी सुविधांचा अभाव असल्याचे निवेदन दिले. रस्ता लाईटसह अन्य मागण्या केल्या. त्यानुसार रस्त्या बनविताना काही तांत्रिक अडचणी सोडवून रस्त्याचे काही प्रमाणात काम झाले असून रस्त्याच्या बाजूने लाईट नसल्याने रात्री च्या दरम्यान विशेषता महिला वर्गाला येथून प्रवास करताना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे खोपोली नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल व स्थानिक नगरसेवक मंगेश दळवी यांच्या पाठपुराव्याने स्ट्रीट लाईट बसविण्याचे काम सुरू झाल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे .