| पनवेल | वार्ताहर |
वर्क फ्रॉम होमद्वारे काम देतो, असे सांगून एका महिलेची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करंजाडे येथील प्रतिभा शुक्ला यांना सप्टेंबर 2023 मध्ये अनोळखी महिलेकडून टेलिग्रामवर जॉबचा मेसेज आला.
यावेळी वर्क फ्रॉम होम, दररोज पगार, बोनस मिळेल असं सांगण्यात आले. यावेळी दहा लाख 88 हजार रुपये डिपॉझिट करा, असे सांगण्यात आले. यावेळी दोन लाख रुपये त्यांच्या खात्यात डिपॉझिट केले व सर्व पैसे परत करण्याची विनंती केली. मात्र त्यांनी पैसे परत केले नाहीत. त्यानंतर कॉल व मेसेज यांना रिप्लाय करण्यास बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येतात त्यांनी पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.