| रायगड | प्रतिनिधी |
नेहरू युवा केंद्र, रायगड- अलिबाग कौशल्य विकास, उद्यमशीलता युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, भारत सरकार व प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने व स्पर्धा विश्व अकॅडमी, अलिबाग यांच्या सहकार्याने मासाहेब जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त राष्ट्रीय युवा दिन व युवा सप्ताहचे आयोजन स्पर्धा विश्व अकॅडमी या ठिकाणी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी निशांत रौतेला यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून डॉ. अॅड निहा अनिस राऊत उपस्थित होत्या त्याचबरोबर राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तथा प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळी, स्पर्धा विश्व अकॅडमीच्या संचालिका तथा स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था,रोहाच्या अध्यक्षा सुचिता साळवी उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमांमध्ये नॅशनल युथ फेस्टिवल 2025 अंतर्गत विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग प्रोग्राममध्ये देशातील सर्व युवकांबरोबर संवाद साधतानाचा लाईव्ह कार्यक्रम प्रोजेक्टरवर दाखवण्यात आला.