कायद्याच्या चौकटीत काम करा- अ‍ॅड. विठोबा पाटील

| श्रीवर्धन | वार्ताहर |

श्रीवर्धन येथील गोखले महाविद्यालयात आयक्यूएम्सी राष्ट्रीय सेवा योजना व तालुका विधी सेवा समिती श्रीवर्धन-म्हसळा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून व युवा दिनाचे औचित्य साधून कायदा व सुव्यवस्था शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

श्रीवर्धन न्यायालयाच्या न्यायाधीश सोनाली जवळगेकर यांच्या मार्गदर्शनाने अ‍ॅड. पी.पी.गायकवाड, अ‍ॅड. विठोबा पाटील, अ‍ॅड. अतुल चौगुले, अ‍ॅड. मालिका श्रीवर्धनकर, अ‍ॅड. लाड, अ‍ॅड. संतोष सापते, अ‍ॅड. गोदावरी करडे, अ‍ॅड. जोशी, अ‍ॅड. गांधी व अधीक्षक आनंद यांनी महाविद्यालयात भेट देऊन विद्यार्थ्यांना कायदा व सुव्यवस्था या संदर्भात उद्बोधन केले. प्राचार्य डॉ. श्रीनिवास जोशी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. कायदेविषयक शिबिराचा हेतु व आवश्यकता अ‍ॅड. विठोबा पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात विशद केली. उपप्राचार्य व रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. किशोर लहारे यांनी शिबिराची रुपरेषा स्पष्ट केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीवर्धनच्या न्या. सोनाली जवळगेकर, तालुका विधी सेवा समिती, सर्व वकील सभासद, प्रा. डॉ. श्रीनिवास जोशी, उपप्राचार्य किशोर लहारे, दिपाली पाठराबे, प्रा. नवज्योत जावळेकर व सर्व प्राध्यापक प्रयत्नशील होते. आभार प्रदर्शन प्रा. दिपाली पाठराबे यांनी केले.

Exit mobile version