कृषी संजीवनी निमित्त तळयात कार्यशाळा

। तळा । वार्ताहर ।
तळा कृषी विभागाच्या वतीने दिनांक 25 जून ते 1 जुलै या कालावधीमध्ये कृषी संजीवनी मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये शेतकर्‍यांना भात लागवडीच्याआधुनिक पद्धती,पौष्टिक तृणधान्यचे आहारातील महत्त्व, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा वापर, 10% रासायनिक खत बचत, महिला कृषी तंत्रज्ञान सक्षमीकरण इत्यादी सारख्या वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे.

27जून रोजी महिला कृषी तंत्रज्ञान सक्षमीकरण दिनाचे औचित्य साधून ग्रुप ग्रामपंचायत मजगाव येथे महिलांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेवंती अबगुल, नुरूद्दीन डांगु, आनंद कांबळे, तालुका कृषी अधिकारी, सागर वाडकर मंडळ कृषी अधिकारी, प्रचीत मसाल,गोविंद पश्‍चिमे, कृषी सहाय्यक, सचिन लोखंडे, आत्मा सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, स्वदेश फाउंडेशन प्रतिनिधी सागर पाटील, आरडीसी बँक प्रतिनिधी उमेश धामणे इत्यादी मार्गदर्शक तसेच मजगाव ग्रामपंचायत हद्दीतील गणेश नगर ताम्हणेतर्फेतळे या ठिकाणाहून 70 ते 75 महिला उपस्थित होत्या.

Exit mobile version