। उरण । वार्ताहर ।
छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून रविवार, दि. 26 जून रोजी उरण तालुक्यातील फुंडे गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या कामाचे भूमीपूजन उरण विधानसभेचे माजी आ. मनोहर भोईर यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी माजी आमदार मनोहर भोईर यांनी ग्रामपंचायत फुंडेचे विद्यमान सरपंच सागर घरत, सदस्या रुचिता म्हात्रे, जुईली घरत, कविता म्हात्रे, हर्षा घरत या सर्व तरुण मंडळीच्या कार्याचे कौतुक केले. तसेच फुंडे गावाच्या विकाससाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत, असे आश्वासन दिले.
या कार्यक्रमासाठी जि.प.चे माजी सदस्य विजय भोईर, फुंडे माजी सरपंच मिनाक्षी म्हात्रे, ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष जीवन घरत, शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते नितीन ठाकूर, ज्येष्ठ नागरिक दिनकर म्हात्रे गुरुजी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवेद्र म्हात्रे, तर आभार सरपंच सागर घरत यांनी मानले.
फुंडे येथे पाण्याच्या टाकीचे भूमीपूजन
