। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
श्री. बहिरेश्वर मित्रमंडळ नेहुली व शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत कुस्त्यांच्या जंगी स्पर्धा मोठ्या उत्साहात गुरुवारी (दि.8) मराठी शाळा मैदान, नेहुली येथे पार पडली. ही स्पर्धा मांडवा येथील विष्णू डहाळे याने गाजवली. तर सांघिक विजेतेपदावर आंदोशी तालीम संघाने आपले नाव कोरले. जय हनुमान संघ वाडगाव आणि द्वितीय तर टाकादेवी मांडवा संघाने तृतीय क्रमांक पटकावले. स्पर्धेचे उद्घाटन शेकाप नेते माजी आ. पंडित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शेकाप जिल्हा चिटणीस अॅड. आस्वाद पाटील, महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, जि.प. माजी सदस्य संजय पाटील, माजी उपसभापती सुरेश पाटील, वरसोली ग्रामपंचायतीचे सदस्य सुरेश घरत, खंडाळे उपसरपंच अशोक थळे, सदस्य नरेश गोंधळी, माजी उपसरपंच संतोष कनगुटकर, विनोद पाटील, कुस्तीगीर संघाचे तालुका अध्यक्ष जयेंद्र भगत, खंडाळे हायस्कूल सभापती नाशिकेत कावजी यांच्यासह बहिरेश्वर मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर पाटील, उपाध्यक्ष किरण पाटील, आखाडा प्रमुख बबन पाटील आदी उपस्थित होते.
भर पावसात मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या स्पर्धेत प्रेक्षकांचा उत्साह देखील तितकाच दिसत होता. अंतिम कुस्तीचा सामना मांडवा येथील विष्णू डहाळे आणि पनवेल येथील किरण ढवळे यांच्यामध्ये रंगला. विष्णू डहाळे याने दोन मिनीटात चार गुण पटकावत किरण ढवळे याच्यावर विजय मिळवला. तर सांघिक स्पर्धेत आंदोशी तालीम संघ आणि जय हनुमान संघ वाडगाव यांचे 21-21 असे समसमान गुण झाल्याने त्यांच्यात चिठ्ठी टाकून अंतिम विजयी संघ जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात नशिबाच्या जोरावर आंदोशी तालीम संघाच्या नावाची चिठ्ठी आल्याने त्यांना अंतिम विजेते घोषीत करण्यात आले. तर 20 गुण झालेल्या टाकादेवी मांडवा संघाला तृतीय क्रमांक मिळाला. या स्पर्धेत नेहुली, वाडगाव, आवास, दिवी पारंगी, आंदोशी, वावे, मांडवा, गोंधळपाडा, बेलवली, फणसापूर, पनवेल येथील तालीम संघ सहभागी झाले होते. पहिल्या फेरीत 60 तर दुसर्या फेरीत 30 अशा एकुण 90 सामने रंगले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी माजी सरपंच विजय थळे, माजी उपसरपंच यशवंत पाटील, काशिनाथ पाटील, सुहास पाटील, भास्कर पाटील आदींसह सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ मंडळानी परिश्रम घेतले. पंच म्हणून प्रमोद भगत, प्रकाश भगत, पंढरी पाटील यांनी काम पाहिले.

चित्रलेखा पाटील यांच्या वतीने सायकलींचे वाटप
सावित्रीच्या लेकी चालल्या पुढे या उपक्रमांतर्गत शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या वतीने नेहुली येथील विद्यार्थीनींना सायकलीचे वाटप करण्यात आले.