| पनवेल | प्रतिनिधी |
कोकणस्थ परिवार, पुणेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय पदक विजेती कुस्तीपटू कृष्णाई वाडकर हिचा खास सत्कार मुग्धा साने यांच्या हस्ते पंडित नेहरू स्टेडियम, पुणे करण्यात आला. अध्यक्षस्थानी सोनिया नेवरेकर होत्या. प्रिया पेडणेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. असफिया सय्यद यांनी प्रास्ताविक केले तर अनुराधा मांजरेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. दीपिका वाडकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. समारंभास कृष्णाईच्या आई प्रियांका, वडील प्रशांत, तसेच वैशाली टेंबवलकर, बाळासाहेब साने, डॉ. अमोल सप्तर्षी, ॲड. सागर कुलकर्णी, प्रा. अजित नगरकर, आनंद पवार, ॲड. दिनकरराव शिंदे, क्रीडा संघटक सुनील नेवरेकर आदी क्रीडाप्रेमी उपस्थित होते. यावेळी कृष्णाईची आजी प्रमिला वाडकर यांचाही खास सत्कार करण्यात आला.
कुस्तीपटू कृष्णाई वाडकर यांचा सत्कार
