यशस्वीला मिळणार टीम इंडियात एंट्री ?

| मुंबई | प्रतिनिधी |

आयपीएल 2023 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा स्टार खेळाडू यशस्वी जैस्वाल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे त्याची वेस्ट इंडिजच्या दौर्‍यासाठी निवड होण्याची शक्यता आहे. भारतीय संघ पाच टी-20 सामन्यांसाठी जाणार आहे. याशिवाय आयर्लंडविरुद्ध तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहेत. यासाठी यशस्वी जैस्वालला टीम इंडियात स्थान मिळू शकते. यावर्षी एकदिवसीय विश्‍वचषक भारतात होणार आहे. अशा स्थितीत टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू आता वनडेवर अधिक लक्ष केंद्रित करतील आणि युवा खेळाडूंना टी-20 मध्ये सतत संधी दिली जाईल, असे मानले पाहिजे.

बीसीसीआय आणि निवड समितीच्या नजरा यशस्वी जैस्वालवर आहे. त्याला भारतीय संघात प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. मात्र, यासाठी जयस्वालने आयपीएल 2023 च्या उर्वरित सामन्यांमध्ये अशीच कामगिरी करत राहणे आणि सतत धावा करत राहणे आवश्यक आहे.

Exit mobile version