यशश्री शिंदे हत्या प्रकरण! संशयित आरोपीला कर्नाटकातून अटक

| उरण | वार्ताहर |

उरण शहरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एन.आय. स्कूल जवळ राहाणाऱ्या यशश्री शिंदे (22) या तरूणीचा कोटनाका पेट्रोल पंपाजवळ नेऊन तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. यशश्रीची हत्या दाऊद शेख नावाच्या व्यक्तीने केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र आरोपी पोलिसांना चकवा देत होता. तो सतत आपलं लोकेशन बदत होता. 4 टीम बंगळूरूला रवाना करण्यात आल्या होत्या. संशयित आरोपी बंगळुरू येथील असल्याचे सांगितले जात होते. अखेर पोलिसांनी आरोपीला नुकतेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरून अटक केली आहे.

यशश्रीचा खून करणाऱ्या आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली होती, मात्र आरोपी पोलिसांना चकवा देत होता. तो सतत आपलं लोकेशन सतत बदत असल्याची माहिती न्हावा -शेवा बंदर विभागाचे सहय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल नेहून यांना मिळाली होती. दरम्यान दुसरीकडे यशश्री शिंदेच्या हत्येमुळे वातावरण चांगलंच तापलं होते. यशश्री शिंदेची निर्घुण हत्या करणाऱ्या आरोपीला तात्काळ फासावर लटकवा, अशी घोषणाबाजी करत हजारो नागरिकांनी रविवारी उरण पोलीस ठाण्यावर अक्रोश मोर्चा काढला होता, या मोर्चात महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या.

नराधम दाऊद शेख हा मूळचा कर्नाटकचा रहिवासी असून उरण येथे ड्रायव्हरचं काम करत होता. त्याची उरण येथे मयत यशश्रीशी भेट झाली. पोलिसांच्या माहितीनुसार याच मुलीच्या संदर्भात त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यातच त्याला तुरुंगवासही झाला. काही महिन्यांपूर्वी तो बाहेर आला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा मुलीच्या संपर्कात येऊन शनिवारी (दि.27) ही घटना घडली होती.

Exit mobile version