। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील रा. जि. प. शाळा गोंधळपाडा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी अनिल राऊत यांनी जीवनात आहार, व्यायाम आणि योगासने यांचे महत्व किती आहे हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तसेच, प्राणायाम, सूर्यनमस्कार आणि विविध योगासनांचे प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांकडून कृती करून घेतली. तर कविता गायकवाड आणि दीपक पाटील सर यांनीदेखील मुलांना योगाचे महत्त्व सांगून मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी राऊत, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि शाळेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.