पीएनपी संकुलात योग दिन साजरा

। अलिबाग । प्रतिनिधी ।
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वेश्‍वी अलिबाग राष्ट्रीय सेवा योजना विभाग, पतंजली योग समिती अलिबाग व भारत स्वाभिमान ट्रस्ट रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने आंतराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाकरिता प्रमुख मार्गदर्शक व योग प्रशिक्षक म्हणून दिलीप गाटे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्व तसेच प्रात्याक्षिकांद्वारे योगाचे प्राणायम यांचा सराव करून घेतला. यावेळी भारत कहाणे, प्रकाश पाटील, मधुकर बयेकर हे सुद्धा उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ओंमकार पोटे यांनी विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्व पटवून देत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्रा. मिलिंद घाडगे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. रवींद्र पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी कला विभाग प्रमुख प्रा. नम्रता पाटील, वाणिज्य विभाग प्रा. रसिका म्हात्रे, क्रीडा विभाग प्रमुख तेजस म्हात्रे इतर शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी सहभागी झाले होते.

Exit mobile version