| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड आणि श्री अंबिका योग कुटीर, ठाणे शाखा अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस एस सावंत यांनी मार्गदर्शन करीत जीवनातील योगाचे महत्व विषद केले. श्री अंबिका योग कुटीर, ठाणे शाखा अलिबागचे योग प्रशिक्षक कुमार जोगळेकर, सिमरन राऊत, जयंत वाखाले यांनी सर्वांना योग प्रशिक्षण दिले. यावेळी जिल्हा सरकारी वकील ॲड. भूषण साळवी, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड प्रवीण ठाकूर यांच्या सह सर्व न्यायाधीश, वकील, न्यायालय कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव अमोल शिंदे यांनी केले.