हिरवळ महाविद्यालयात योगदिन साजरा

। माणगाव । वार्ताहर ।
महाडमधील हिरवळ महाड महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे जागतिक योग दिवसाचे औचित्य साधुन योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्रा. सुदेश कदम यांनी नियमित व्यायाम व संतुलित आहार याची काळजी घेण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर या कार्यक्रमा अंतर्गत सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी ताडासान, वृक्षासान, अनुलोम -विलोम, कपालभार्ती अशी विविध योगासने व प्राणायाम करून योग दिवस साजरा केला.
महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना संतुलित आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी योग संबंधित विविध कार्यक्रम महाविद्यालयात राबविण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष किशोर धारिया व संचालिका सोनाली धारिया, प्रमुख सल्लागार डॉ. संध्या कुलकर्णी व प्राचार्य सुदेश कदम यांचे मार्गदर्शन लाभले.

Exit mobile version