। माणगाव । वार्ताहर ।
हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, महाड येथे 14 जुन रोजी महाविद्यालयाचे विज्ञान विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्या उपस्थितीत जागतिक रक्तदाता दिवस साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष किशोर धारिया, सोनाली धारिया यांनी नेहमीच समाज हितउपयोगी कार्यक्रम महाविद्यालयात राबविण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांच्या प्रोत्साहनाने व संस्थेच्या प्रमुख सल्लागार डॉ. संध्या कुलकर्णी, प्राचार्य सुदेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यानांमध्ये सामाजिक जबाबदारी बद्दल जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.