। माणगाव । वार्ताहर ।
ग्रामपंचायत कडापे व स्वदेस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासन पंचायत समिती माणगाव व जिल्हा परिषद मार्फत महापंचायत राज अभियान राबविण्यात आले. ग्रामपंचायत हद्दीतील सर्व वाड्या वस्त्या कांदळगाव बुद्रुक, कडापेवाडी, कडापे, येरद, येरद आदिवासी वाडी बांदलवाडी व जवळील ग्रामपंचायत मधील लोकांनी लाभ घेतला. यावेळी या अभियानात सहभागी होवून नागरिकांनी उस्पुर्त प्रतिसाद दिला.
यावेळी माणगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी वाय. प्रभे, मारुती मोकाशी व सर्व ग्रामपंचायत सदस्य, विस्तार अधिकारी गायकवाड, मिंडे, पशुधन पर्यवेक्षक मोकल, कदम व सहकारी, महसूल मंडळ अधिकारी व तलाठी, बँक ऑफ महाराष्ट्र उपव्यवस्थापक ठाकूर व सहकारी, प्राथमिक आरोग्य वैद्यकीय अधिकारी इंगोले व सर्व सहकारी, अंगणवाडी व आशा सेविका उपस्थित होते.