। म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा तालुक्यांतील आरोग्य विभागांत आरोग्य विषयक त्रुटी अनेक असतानाच सेवा आणि कर्मचारी वर्ग या विषयीच्या टिका होत आसत आता दस्तुरख़ुद्द कर्मचार्यानी खात्यातील कारकून मयुर खांबे यांच्या मनमानी कारभाराची वरीष्ठ दखल घेत नसल्याने उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे.
प्रा.आ. केंद्रांतील कर्मचार्यांची,सेवा पुस्तके,डीसीपीएस, पगार, मिळणारे वेतन, भत्ते, अतिरीक्त रक्कम पगारांत जमा करणे अशा विविध आर्थिक अभिलेखा बाबत नियमीतता ठेवली नसल्याने आमचे अनेक मुद्यांबाबत सदरच्या कर्मचार्याने समाधान केले नाही, त्याच पद्धतीने स्थानिक, तालुका पातळीवरील आधिकार्यानी आमच्या आर्थिक अभिलेखातील त्रुटींची पुर्तता करून घ्यावी या मागणीकडे गांभीर्याना न बघीतल्यामुळे गुरवार दि.23जून रोजी एक दिवसाचे उपोषण करणार असल्याचे प्रा.आ. केंद्र खामगावच्या आरोग्य सेविका स्नेहलता खैरे, प्रेषिता सातनाक, कैलास घरत, संगिता सारंगे यानी जिल्हा व तालुका प्रशासनाला योग्य कालावधीत पत्र देऊन अंतीम पर्याय उपोषण हे पत्राव्दारे कळविले आहे.