देवीचे दागिने चोरण्याची महिलेची कला पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क

अज्ञात महिला दोन मुलांसह चोरी करताना सीसीटिव्हीमध्ये कैद
पोलिसांकडून तपास करण्यात आला सुरू

पनवेल | राज भंडारी |

देविंना अलंकार अर्पण करून त्यांना साजविले जाते ही आहे श्रद्धा ….. देवींच्या अंगावर परिधान केलेले अलंकार चोरी करणे ही आहे विकृती…. असाच प्रकार सुकापुर गावातील गावदेवी मंदिरात घडला आहे. येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या या गावदेवी मंदिरात एका अज्ञात महिलेने देवीच्या दर्शनाचे निमित्त साधून देवीच्या अंगावरील दागिन्यांची चोरी केली आहे. सदर घटना मंदिराच्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. या महिलेसोबत दोन लहान मुले यावेळी होती. तसेच या महिलेच्या डाव्या हातावर अपूर्वा असे नाव गोंदलेले आहे. सदर प्रकार ग्रामस्थांना कळताच ग्रामस्थांनी या महिलेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. मात्र कोरोनामुळे तोंडावर मास्क बांधण्यात आले असल्यामुळे स्पष्टपणे ओळख जरी पटली नसली तरीही पोलीस तांत्रिक तपासाच्या आधारे या महिलेचा छडा लावतील, असा विश्वास ग्रामस्थांना आहे.

Exit mobile version