ऑस्ट्रियन राजदूतांनी केले खेळाडूंचे स्वागत
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
टीव्ही 9 नेटवर्कच्या पुढाकाराने आकाराला आलेल्या इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेस उपक्रमातंर्गत 28 प्रतिभावंत फुटबॉलर्सनी जगाला आपल्या प्रतिभेची झलक दाखवली आहे. यात 16 मुलं आणि 12 मुली आहेत. हे सर्व युवा फुटबॉलर्स ऑस्ट्रियाच्या गमुंडेन येथे एक आठवड्याची फुटबॉल ट्रेनिंग करुन भारतात परतले आहेत. या चॅम्पियन युवा फुटबॉलर्सच सोमवारी दिल्लीत ऑस्ट्रियाच्या राजदूत कॅथरीना वीसर यांनी स्वागत केलं.
भारतातील ऑस्ट्रियाच्या राजदूत कॅथरीना वीसर या युवाफुटबॉलर्सच्या स्वागत समारंभाच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाल्या की, या युवा फुटबॉलर्सना ऑस्ट्रियातून नवीन कौशल्य, आत्मविश्वास आणि आंतरराष्ट्रीय अनुभव घेऊन परतताना पाहणे प्रेरणादायक आहे. भारत-ऑस्ट्रियामधील नागरिकांच्या रिलेशनला प्रोत्साहन देणार्या तसचं युवा भारतीय प्रतिभेसाठी दरवाजे उघडणार्या उपक्रमांच समर्थन करण्याचा आम्हाला अभिमान आहे असं कॅथरीना वीसर म्हणाल्या. मागच्यावर्षी देशात ऐतिहासिक फुटबॉल प्रतिभा शोधण्याचा सुरु झालेला कार्यक्रम धूमधडाक्यात पूर्ण झाला. याचं समापन जर्मनीचा आघाडीचा क्लब वीएफबी स्टटगार्टच्या दौर्याने झाला. या युवा फुटबॉल चॅम्पियन्सनी ऑस्ट्रियात युरोपियन कोचेसकडून ट्रेनिंग घेतली व आपल्या प्रतिभेच प्रदर्शन केलं. 28 युवकांपैकी चौघांना जर्मनीच्या स्टटगार्ट येथे एमएचपी एरिना वीएफबी स्टटगार्ट अंडर-12 टीमसोबत दोन दिवसाच्या ट्रेनिंग सेशनसाठी निवडण्यात आलं.
गमुंडेन येथे ट्रेनिंग कॅम्प ऑस्ट्रियाई गेरहार्ड रीडल, इंडिया फुटबॉल सेंटर फॉर टेक्निकल एक्सीलेंस इन स्पोर्ट्स एंड एजुकेशन (आयएफसी) चे अध्यक्ष आणि आरआयईएसपीओचे सीईओच्या प्रयत्नांमुळे शक्य झालं. व्यावसायिक फुटबॉल प्रशिक्षणाचा स्तर वाढवणं तसेच देशात उदयोन्मुख फुटबॉल प्रतिभांचा शोध आणि निवड प्रक्रियेत सुधारणा हा या उपक्रमामागचा उद्देश आहे.
पंतप्रधानांनी युवा खेळाडूंना दिलेला निरोप
या खास उपक्रमाच भाग बनण्यासाठी भारतातील 50 हजारपेक्षा अधिक युवकांनी अर्ज केला होता. यात 12 ते 17 वयोगटातील खेळाडूंची निवड झाली. 28 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही 9 व्हॉट इंडिया थिंक्स टुडे (डब्ल्यूआईटीटी) समिट 2025 दरम्यान युवा खेळाडूंना व्यक्तिगत निरोप दिला होता.