स्लाइडिंगची काच डोक्यात फोडून तरुणाला मारहाण

। पनवेल । प्रतिनिधी ।

शिवीगाळ आणि दमदाटी करून मारहाण करत स्लाइडिंगची काच डोक्यात मारून दुखापत केल्याप्रकरणी प्रिन्स बहादूर पाल आणि जयसिंग मोतीलाल पाल रा. राधाकृष्ण सोसायटी, शिवकर गाव यांच्याविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमाकांत रामभवन पाल हा करंजाडे येथे राहणारा असून, तो साई अल्युमिनियम अँड ग्लास वर्क्स या दुकानात स्लाइडिंगचे काम करत होता. यावेळी दोन्ही आरोपी तेथे आले. आपण घेतलेले स्लाइडिंगचे काम उमाकांत याच्यामुळे मिळाले नाही, असे म्हणत त्यांनी त्याला शिवीगाळ व दमदाटी केली आणि मारहाण केली. यावेळी प्रिन्स पाल याने स्लाइडिंगची काच उमाकांतच्या डोक्यात जोरात मारल्याने तो जखमी झाला. या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Exit mobile version