| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव ते गोरेगाव रेल्वे स्थानकाच्या दरम्यान कोकण रेल्वेच्या धडकेने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदरची घटना बुधवार दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. प्रथमेश प्रकाश तेटगुरे (23) रा. मुगवली, माणगाव असे मृत तरुणाचे नाव आहे.
सदर घटनेबाबत माणगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गोरेगाव बाजूकडे जाणारी कोचिवल्ली विकली एक्सप्रेस ही इलेक्ट्रिकल पोल क्र. 34/26 च्या जवळ आली असता रेल्वेची धडक लागल्याने प्रथमेशच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो मयत झाला. या घटनेची नोंद माणगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.