। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ गावातील वाल्मिकीनगर येथे राहणारा तरुण आपली मूळ गावी पादीरवाडी येथे बैठकीसाठी जात होते. त्यावेळी कर्जत-मुरबाड राजमार्ग रस्त्यावर भागूचीवाडी येथे त्यांच्या दुचाकीला अज्ञात इसमाच्या वाहनाने दिलेल्या धडकेत त्यांच्या व्हॅनला अपघात झाला. दरम्यान, खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार थळकर हे करीत आहेत.