तरूणांनी बजावला मतदानाचा हक्क

| पाताळगंगा | प्रतिनिधी |

जिल्हा परिषद व पंचायत समितीचे मतदान शनिवारी (दि.7) पार पडले. यापूर्वी मतदारांमध्ये समाज माध्यमांसह विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात आली. त्यामुळे आपण केलेल्या मतदानातून आपल्या जिल्ह्यासह तालुक्याचा आणि गावाचा विकास होणार असल्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये मतदानाविषयी चांगला भाव निर्माण झाला आहे. त्यामुळे पाताळगंगा परिसरातील नागरीक मोठ्या उत्साहाने मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले.

आजचे राजकारण तरुणांच्या खांद्यावर असल्यामुळे रॅली तसेच जाहिर संभांमध्ये तरुण वर्गांचा मोठ्या प्रमाणात समावेश दिसून आला. विविध माध्यमांतून तरूण वर्गात जनजागृती करण्यात आली. त्यामुळे त्यांनाही मतदानाचा अधिकार आणि महत्त्व पटले आहे. आपण नोकरी सांभाळून लोकशाहीला मजबूत करण्यासाठी मतदान केले पाहिजे. या उदात्त विचारातून आपल्याला मिळालेल्या सुट्टीचा दुरूपयोग न करता पाताळगंगा परिसरातील तरूण वर्गासह जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व उमेदवार, कामगार, गृहीणी आणि ज्येष्ठ नागरिकांनी मतदानांचा हक्क बजाविला.

Exit mobile version