| मुंबई | प्रतिनिधी |
विक्रोळीतील कन्नमवार नगर परिसरातील इमारत क्रमांक 97 मध्ये राहणाऱ्या एका तरुणीने 22 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी (दि. 26) रात्री घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणीने इमारतीच्या 22 व्या मजल्यावरील टेरेसवरून उडी मारली. उडी मारल्यानंतर तिच्या शरीराचे दोन तुकडे झाले आणि तिचा जागीच मृत्यू झाला. हर्षला तांदोलकर (23), रा. इमारत क्रमांक 97, कन्नमवार नगर, विक्रोळी)असे मृत तरुणीचे नाव आहे. घटनास्थळी विक्रोळी पोलिस दाखल झाले असून, या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे.