अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा तरुण अटकेत

। पनवेल। वार्ताहर ।

अल्पवयीन मुलीसोबत मैत्री करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तरुणाला कामोठे पोलिसांनी अटक केली आहे. मनीष वारीया (28) रा. रसायनी असे त्याचे नाव आहे. मनीष याने सुरुवातीला 14 वर्षीय पीडित मुलीसोबत मैत्री करून तिच्यासोबत जवळीक साधली. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केले. याबाबतची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्यावर पोलिसांनी मनीष याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला पनवेल-अलिबाग रोड येथून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

Exit mobile version