दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेलमधील कुंडेवहाळ बस स्थानकाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने रस्त्याने चालत जाणाऱ्या दोघांना धडक दिली. या अपघातात 35 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू, तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव राजुकुमार बिंद (35) तर जखमी झालेल्या त्याच्या मित्राचे नाव चंदलाल राममल्हार बिंद (30) असे आहे. चंदलाल बिंद व त्याचा मित्र राजुकुमार बिंद हे दोघे ओव्हळे येथून कुंडेवहाळच्या दिशेने पायी जात होते. दोघेही कुंडेवहाळ बसस्थानक रस्त्यावर आले असताना मागून येणाऱ्या भरधाव मोटारसायकलने दोघांना जोरदार धडक दिली.

Exit mobile version